नवीन अ‍ॅप्रेन्टिशीप कायद्यातील तरतुदी आणि त्या माध्यमातून उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षित युवकांना रोजगार संधी प्रदान करण्यासंदर्भात विविध उद्योजक प्रतिनिधींशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.

0
598

नवीन अ‍ॅप्रेन्टिशीप कायद्यातील तरतुदी आणि त्या माध्यमातून उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षित युवकांना रोजगार संधी प्रदान करण्यासंदर्भात विविध उद्योजक प्रतिनिधींशी आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. मंत्री  संभाजी पाटील निलंगेकर आणि  रणजित पाटील तसेच अनेक उद्योग प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शासकीय पोर्टलवर उद्योगांची नोंदणी, प्राधान्य तत्त्वावर 25 टक्के कौशल्य प्रशिक्षितांना संधी, अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होऊ न शकलेल्या तरूणांना अधिकाधिक संधी, प्राथमिक प्रशिक्षणासाठी विविध संस्थांशी भागिदारी, उद्योगांच्या मागणीनुसार शिक्षणपद्धती, रोजगार प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करणे आदी विषय या चर्चेत समाविष्ट होते. आजचा हा संवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि यातून ही व्यवस्था आणखी भक्कम करण्यासाठी मोठी मदत मिळेल. अ‍ॅप्रेन्टिशीप कायदा अतिशय पारदर्शक करण्यात आला आहे. प्रक्रिया सुलभ करण्यात आला आहे. युवकांना अधिकाधिक संधी प्रदान करणे यासाठी अधिक सहकार्याने काम करू आणि आजही चर्चा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
CM Devendra Fadnavis interacted with various stake holders on new Apprenticeship Act and more engagement of skilled youths by industries at a meeting in Mumbai. Ministers Sambhaji Patil Nilangekar and Ranjeet Patil, many eminent representatives from industries were present.
Registration of industries on Govt portal, engaging 25% of total Human Resource on priority basis, extending engagements to non-engineering pass outs, partnership with nearby institutions for basic training, curriculum format as per industry demand & reduction in recruitment cost got discussed. CM termed this discussion as insightful and important for identifying the gaps and said that entire process has been eased. New Apprenticeship Act is very transparent. We have to work in close coordination to provide better opportunities to youth & this discussion will be helpful in achieving this goal, he further said.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here