CM Devendra Fadnavis at #SamadhanShibir organised for the citizens of South-West constituency of Nagpur.

0
597

नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध तक्रारीचे निवारण करण्यासाठी आयोजित समाधान शिबिराला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मंत्री शचंद्रशेखर बावनकुळे, खासदार, आमदार आणि विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या समाधान शिबिरात एकूण 6977 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी 6956 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. उर्वरित 21 तक्रारींमधील अडचणी दूर करून त्याचेही निराकरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांच्या हस्ते नागरिकांना विविध लाभांचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप करण्यात आले. जयताळा आणि व्हीएनआयटी येथील 33 केव्ही सबस्टेशन्सचे ई-लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर दीक्षाभूमी आणि खामला सबस्टेशन्सचे ई-भूमिपूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशा समाधान शिबीरांचे आयोजन केले आणि कोट्यावधी लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. अनेकदा लोकांना सरकारच्या योजनांची माहिती नसते. त्याचा लाभ कसा घ्यावा आणि फायदे काय, याची सर्व माहिती मिळविण्यासाठी आम्ही महालाभार्थी पोर्टल सुरू केले आहे. सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांना वेळेवर सेवा दिल्या जात आहेत आणि यातून समाधान होण्याचे प्रमाण 92% आहे. अनेक जिल्ह्यात जागतिक दर्जाचे डॉक्टर बोलावून अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केली गेली. त्यातून अनेक लोक लाभान्वित झाले. मुख्यमंत्री सहायता निधीतून सुद्धा अनेकांना लाभ देण्याचा प्रयत्न होतो आहे.
CM Devendra Fadnavis at #SamadhanShibir organised for the citizens of South-West constituency of Nagpur. Minister Chandrashekhar Bawankule, MP, MLAs and officials of various depts were present.
Total 6977 complaints were received for #SamadhanShibir & 6956 complaints were solved. CM instructs to clear hurdles in remaining 21 complaints. CM distributed certificates of various benefits to citizens on this occasion, including battery operated bicycles to #Divyangjan. CM also performed e-dedication of 33 KV substations at Jaitala and VNIT from this program and e-Bhumipujan for Deekshabhumi and Khamla Substations. With Right to Services Act many people are getting timely services and disposal rate is 92%. We have organised such #SamadhanShibir in many parts of Maharashtra and crores of people got benefited because of it. Many times people don’t know about the Govt schemes & how to avail, so now we have started MahaLabharthi portal for getting all info & benefits at single click. We have organised many healthcare camps in presence of world reputed doctors in many districts. Various people are getting benefits with #CMReliefFund , said CM.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here