0
678

आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि सामाजिक कार्यकर्ते  अण्णा हजारेजी यांचा संघर्ष एकसमान ध्येयासाठी आहे. एक सरकारमध्ये आहे आणि एक जनतेत आहे. शेतकर्‍यांची समृद्धी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हेच ध्येय साध्य करण्यासाठी दोघेही कार्यरत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे उत्पादनमूल्याच्या दीडपट हमीभावासाठी कोणते घटक समाविष्ट केले जातील, याची लेखी हमी केंद्र सरकारने त्यांना दिली आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाने केलेले श्रम सुद्धा त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकपाल, लोकायुक्त, निवडणूक सुधारणा, कृषीमूल्य आयोगाला अधिक स्वायत्तता इत्यादी मागण्यांवर सुद्धा अतिशय सकारात्मक आणि ठोस अभिवचन त्यांना देण्यात आले. श्री अण्णा हजारे हे सतत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करण्याचे काम करतात, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.


Our PM Narendra Modi  & #AnnaHazare  struggle is for the same cause. One is in Govt & other in public. Both are determined for prosperity of farmers & corruption free India.
Both leaders are struggling to achieve same goal. Union Government has given in writing on what all will be included while deciding MSP as per the recommendations of Swaminathan Commission ie 1.5 times more MSP of the production cost. It also includes even labour work done by farmers. Rest all the demands of Lokpal, Lokayukta, electoral reforms, more autonomy to agriculture price commission has been given concrete and positive consideration. Many thanks to Anna Hazare ji for his continuous guidance to Maharashtra Government: CM Devendra Fadnavis in #NewDelhi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here